LIMSwiki
Contents
Appearance
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे |
वर्षे: | २००१ - २००२ - २००३ - २००४ - २००५ - २००६ - २००७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
जानेवारी-जून
- जानेवारी ४ - मिखाइल साकाश्विली जॉर्जियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- जानेवारी ४ - नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली.
- फेब्रुवारी १ - मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार.
- फेब्रुवारी २७ - फिलिपाईन्समध्ये अबु सयफ या अतिरेकी गटाने फेरीवर बॉम्बस्फोट घडवले ११६ ठार.
- मार्च १ - मोहम्मद बह्र अल-उलुम इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- मार्च २ - इराकवरील अमेरिकन आक्रमण - अल कायदाने अशुराचा मुहुर्त साधून १७० व्यक्तिंची हत्या केली. ५०० जखमी.
- मार्च २ - संयुक्त राष्ट्रांचा शस्त्रनिरीक्षण संघाने ने जाहीर केले की इ.स. १९९४ नंतर इराककडे अतिविनाशकारी शस्त्रास्त्रे नव्हतीच.
- एप्रिल १ - गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.
- एप्रिल २० - युटिका, ईलिनॉय शहरात एफ.३ टोर्नेडो. ८ ठार.
- एप्रिल २० - इराकच्या अबु गरीब तुरुंगावर हल्ला. २२ कैदी ठार. ९२ जखमी.
- मे ९ - एका जाहीर कार्यक्रमात व्यासपीठाखाली ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात चेच्न्याच्या राष्ट्राध्यक्ष अखमद काडिरोव्हचा मृत्यू.
- मे २२ - अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील हलाम या गावात एफ.४ टोर्नेडो. ४ कि.मी. रुंदी असलेल्या या टोर्नेडोने सगळे गाव नेस्तनाबूद केले. आधीच धोक्याची सूचना मिळाल्यामुळे फक्त एक नागरिक ठार.
- मे २२ - भारताचे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांचा शपथविधी
- मे २३ - पॅरिसच्या चार्ल्स दि गॉल विमानतळाचा काही भाग कोसळला. ५ ठार. ३ जखमी.
- जून ७ - शिरोमणी अकाली दल (लॉॅंगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.
- जून २१ - स्पेसशिपवन या पहिल्या खाजगी अंतराळयानाचे पहिले उड्डाण.
जुलै-डिसेंबर
- जुलै ३ - थायलंडची राजधानी बॅंगकॉकची भुयारी रेल्वे सुरू.
- जुलै ११ - सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला.
- जुलै १२ - पेद्रो संताना लोपेस पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी.
- जुलै १७ - भारतातील कुंभकोणम शहरात शाळेला आग लागली. ९० विद्यार्थी ठार.
- ऑगस्ट १ - पेराग्वेची राजधानी ऍसन्शनमधील सुपरमार्केटमध्ये आग. २१५ ठार, ३०० जखमी.
जन्म
मृत्यू
- फेब्रुवारी २३ - विजय आनंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- फेब्रुवारी २३ - सिकंदर बख्त, भारतीय राजकारणी, केरळचा राज्यपाल.
- एप्रिल १७ - सौंदर्या, दक्षिण भारतीय अभिनेत्री.
- एप्रिल १८ - रतु सर कामिसेसे मारा, फिजीचा प्रथम पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष.
- मे १७ - कमिला तय्यबजी, वकील, समाजसेविका.
- जून १७ - इंदुमती परीख, सामाजिक कार्यकर्त्या.
- जून ५ - रोनाल्ड रेगन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- जून २६ - यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता.
- जुलै ५ - ह्यू शियरर, जमैकाचा पंतप्रधान.
- जुलै ६ - थॉमस क्लेस्टिल, ऑस्ट्रियाचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै १९ - झेन्को सुझुकी, जपानचा पंतप्रधान.
- ऑगस्ट १५ - अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री.
- सप्टेंबर १८ - डॉ. भालचंद्र दिनकर फडके, मराठी समीक्षक, साहित्यिक.
- ऑक्टोबर ५ - रॉडनी डेंजरफील्ड, अमेरिकन अभिनेता.
- डिसेंबर २१ - औतारसिंग पेंटल, भारतीय वैद्यकीय शास्त्रज्ञ.
- डिसेंबर २८ - जेरी ऑर्बाख, अमेरिकन अभिनेता.