Effects of the storage conditions on the stability of natural and synthetic cannabis in biological matrices for forensic toxicology analysis: An update from the literature

दुवे संपादा

महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे. पूर्वी खेडेगावांमध्ये वस्तू-विनिमय पद्धत अस्तित्वात होती या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता. म्हणजेच शेतकरी हा धान्य पिकवत असे आणि जे शेतकरी नव्हते ते शेतकऱ्यास व इतरांस सेवा पुरवीत असत. यामध्ये जे शेतकऱ्याच्या नैमित्तिक स्वरूपाच्या गरजा पुरवत त्यांना अलुतेदार (नारू) तर जे महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा भागवीत त्यांना बलुतेदार (कारू) असे म्हणत. हे गावाचे वतनदार असत आणि पिढ्यान्‌पिढ्या तेच ठरावीक काम करीत.

बलुतेदारांची यादी

बलुतेदारांची संख्या एकूण बारा होती.

  1. कुंभार
  2. कोळी समाज
  3. गुरव
  4. चांभार
  5. मातंग
  6. तेली
  7. न्हावी
  8. परीट
  9. महार
  10. लोहार
  11. सुतार

12 जोशी

बलुतेदारांच्या अन्य याद्या

  1. कुंभार
  2. कोळी समाज
  3. गवळी
  4. गुरव
  5. चांभार
  6. जोशी
  7. धोबी
  8. न्हावी
  9. मातंग
  10. लोहार
  11. सुतार
  12. महार


क्वचित काही ठिकाणी ’तेली’ऐवजी ’मुलाणा’ दिले आहे. याचा अर्थ असा की बलुतेदारांची नावे इलाख्या-इलाख्यांत वेगवेगळी असू शकते. यादी कोणतीही असली तरी प्रत्येक गावात बाराही बलुतेदार असतीलच असे नाही. ज्या गावात बलुतेदार नव्हते तेथे अलुतेदार हे बलुतेदाराचे काम करत असत. तेली हिंदू तर मुलाणा मुसलमान असतात.

मुस्लिम बलुतेदार

  1. आत्तार
  2. कुरेशी
  3. छप्परबंद
  4. तांबोळी
  5. पिंजारी-नदाफ
  6. फकीर
  7. बागवान
  8. मदारी
  9. मन्यार
  10. मोमीन
  11. मिसगर (?)
  12. शिकलगार

हे सुद्धा पहा

बलुतेदार या विषयावरील पुस्तके

  • बलुतेदा लोहार समाजाच(शंकर सखाराम)
  • बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे (प्रल्हाद लुलेकर)

संदर्भ

बाह्य दुवे