FAIR and interactive data graphics from a scientific knowledge graph
बगदाद بـغداد |
|
इराक देशाची राजधानी | |
देश | इराक |
जिल्हा | बगदाद |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ५०० |
क्षेत्रफळ | १,१३४ चौ. किमी (४३८ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ११२ फूट (३४ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ६५,५४,१२६ |
http://www.baghdadgov.com/en/ |
बगदाद ही इराक देशाची राजधानी व स्वतः एक प्रांतही आहे. २०११ मध्ये बगदादची लोकसंख्या लघबग ७२,१६,०४० होती ज्यामुळे ते इराकमधले सर्वात मोठे शहर, तसेच अरबी देशांत कैरो, इजिप्त पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे व पश्चिम आशियात तेहरान, इराण नंतर दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरते.
तैग्रिस नदीच्या काठावर असलेले हे शहर ८व्या शतकात स्थापले गेले आणि अब्बासिद कालिफातीची राजधानी बनले. स्थापनेनंतर थोड्याच काळात बगदादची प्रगती इस्लाम जगातले एक महत्त्वाचे सांस्कृतिक, व्यापारी व विचारवंतांचे केंद्र इथपर झाली. इथे बऱ्याच शैक्षणिक संस्था कार्यरत असल्याने बगदादला शिक्षणाचे माहेरघर असा मान प्राप्त झाला. ११ ते १३ व्या शतकांत अंदाजे १२,००,००० लोकसंख्येचे बगदाद हे जगातील सर्वात मोठे शहर आहे असे मानले जाई. मंगोल साम्राज्याहाती ह्या शहराचा १५२८ मध्ये जवळजवळ विध्वंस झाला. तिथून सुरू झालेली अधोगती ही पुढील बरीच शतके वरचेवर होणारा प्लेग व एकामागून एक झालेले साम्राज्य बदल ह्यामुळे चालूच राहिली. शेवटी १९३८ मध्ये स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाल्यावर बगदाद शहराने हळूहळू करत अरब जगाचे सांस्कृतिक केंद्र ही आपली पुर्वीची ओळख परत मिळवली.
हल्लीच्याच काळात मार्च २००३ला अमेरिकेच्या आघाडीने केलेल्या इराकवरील कब्जा जो डिसेंबर २०११ पर्यंत टिकला व ज्या दरम्यान प्रचंड जातीय दंगे झाले त्यात बगदाद शहरातल्या मूलभूत सोयीचे (रस्ते, पूल, इमारती इ. ) बरेच नुकसान झाले. अजूनही बगदाद शहराला अतिरेकी व आतंकवादी कारवायांपासून नुकसान सोसावे लागत आहे.